मेंढपाळाने एक कोटीची ऑफर नाकारली, आकाशातून पडलेला दगड म्युझियमला केला दान

मेंढय़ा चारत असताना एका मेंढपाळाला आकाशातून भलामोठा दगड पडलेला दिसला. हा दगड साधासुधा नव्हता. तो एका दुर्मिळ उल्कापिंडाचा तुकडा होता. खरंतर त्या मेंढपाळाला कोटय़धीश होण्याची संधी चालून आली होती. त्याला उल्कापिंडांसाठी चार-पाच संशोधकांनी एक कोटीची ऑफर दिली होती. मात्र त्याने ही ऑफर नाकारली आणि तो दगड समाजाच्या भल्यासाठी म्युझियमला दिला. याबद्दल त्या मेंढपाळाचे सर्वत्र काैतुक होत आहे. ब्रिटनमधील कॉट्सवोल्डच्या ग्रामीण भागातील ही घटना आहे. व्हिक्टोरिया बांड असे मेंढपाळाचे नाव असून त्याला फेब्रुवारी महिन्यात हा दगड सापडला. त्याचे वजन 103 किलो होते. 17 मेपासून हा उल्कापिंड म्युझियममध्ये बघता येईल.

  • मेंढपाळ बांड यांना सापडलेला उल्कापिंड चार अब्ज वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचे तुकडे अब्ज वर्षांपासून अंतराळात तरंगत होते. त्याच्यामुळे अंतराळातील जीवसृष्टीचे रहस्य उलगडू शकते. हा अत्यंत दुर्मिळ उल्कापिंड असून त्याचे नाव विंचकोंबे मेटेरॉईट असे ठेवण्यात आले आहे. हा कार्बनेशियस कोंड्राईटचा एक प्रकार असल्याचे म्हटले जाते.
आपली प्रतिक्रिया द्या