गोड–तिखट चटणी, गरमागरम, चविष्ट मुंबईचा वडापाव ‘लय भारी’, ब्रिटिश उच्चायुक्तांनीही चाखली चव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई आणि महाराष्ट्राची ओळख असलेला, गोड-तिखट चटणीचा मुलामा, गरमागरम, चविष्ट वडापावाच्या प्रेमात आता परदेशी पाहुणेही पडले असून हिंदुस्थानातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनीही आज वडापावची चव चाखत चक्क मराठीतून ‘लय भारी’ अशी टिप्पणी केली. गरीबांचा, काबाडकष्ट करणाऱयांचा वडापाव आता परदेशी पाहुण्यांनाही भुरळ घालू लागला आहे.

हिंदुस्थानी भाषा, खाद्यसंस्कृतीशी आपुलकीने जोडले गेलेले ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस हे नेहमीच काही तरी विशेष पोस्ट सोशल मीडियावर करत असतात. हिंदुस्थानी खाद्यपदार्थांबाबत त्यांना विशेष आवड आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दोन दिवसांसाठी आलेल्या अॅलेक्स यांनी गणेशोत्सव चित्रशाळेला भेट दिल्यानंतर मुंबईकरांची जान आणि शान असलेल्या वडापावची चव घेतली. गेट वे ऑफ इंडियाच्या पार्श्वभूमीवर नाश्त्याचा आनंद घेतानाचा एक पह्टो त्यांनी शेअर केला. ‘‘मुंबईत वडापाव खाण्यासाठी माझ्याकडे नेहमीच वेळ असतो’’ असे इंग्रजीत सांगत पुढे ‘‘लई भारी’’ असे चक्क मराठीत लिहिले आहे. वडापाव आणि मराठीला त्यांनी ही दिलेली दाद यामुळे नेटकऱयांनी त्यांच्यावर काwतुकाचा वर्षाव केला आहे.

डबेवाल्यांकडून खास टिफीन भेट

स्ट्रीट फूडचा आनंद घेतल्यानंतर एलिस यांनी मुंबईच्या प्रसिद्ध डबेवाल्यांचीही भेट घेतली. डबेवाल्यांनी त्याला एक टिफीन बॉक्स (डबा) भेट दिला. डबेवाल्यांबरोबर एक पह्टो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यांच्या स्वाक्षरी असलेला मल्टीलेअर टिफिन बॉक्स भेट म्हणून मिळाल्याचा आनंद आहे, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली