
आपल्याच बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या एका भावाने तिला दुसऱ्यासोबत पाहून तिची हत्या केली आहे. या तरुणाला अटक करण्यात आली असून लवकरच त्याच्यावर पुढील खटला चालणार आहे.
ही घटना अमेरिकेतील टेक्सास इथली आहे. या तरुणाचं नाव जोस मॅन्युअल गुजमॅन असं आहे. तो मूळचा दक्षिण अमेरिकेतील ग्वाटेमालाचा रहिवासी आहे. पण वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तो अमेरिकेत राहत असल्याने त्याच्याकडे अमेरिकन नागरिकत्व आहे. तो एल पासो इथे राहतो.
त्याची एक बहीण ग्वाटेमाला इथेच जन्माला आली. पण, बऱ्याच काळानंतर ती देखील अमेरिकेत त्याच्यासोबत येऊन राहू लागली. जोस आणि तिच्यात शारीरिक संबंध होते. 1 फेब्रुवारी रोजी जोस आणि त्याच्या बहिणीत वाद झाला होता. त्यानंत त्याने तिच्या तोंडावर बुक्का मारून तिचा दात तोडला होता.
हा वाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला घरात आणखीही कुणीतरी असल्याचं समजलं. ती व्यक्ती म्हणजे त्यांचा शेजारी होती. आपल्या बहिणीचे शेजाऱ्यासोबत देखील संबंध असलेले पाहून जोस संतापला. संतापाच्या भरात त्याने बेसबॉलच्या बॅटने तिच्या डोक्यावर अनेकवेळा प्रहार केले. त्या हल्ल्यात ती मृत्युमुखी पडली.
हत्येनंतर त्याने फोन करून आपल्या आईला या गुन्ह्याची कल्पना दिली. त्याच्या आईने पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार कळवला. पोलीस येईपर्यंत जोस केलेल्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करत होता. मात्र, तोपर्यंत पोलीस आल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याच्या घरात बेसबॉलच्या बॅटसह, मसाजर आणि कपड्यांनी भरलेली एक बॅग सापडली. त्यात अंमली पदार्थ देखील होते. त्याने आपल्याला या पदार्थांचं व्यसन असल्याचं कबूल केलं आहे.
आता जोसवर खटला चालणार असून लवकरच त्याला शिक्षा सुनावण्यात येईल.





























































