
पाकिस्तानी सैन्याच्या अंधाधूंद गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानचा आणखी जवान शहीद झाला. 9 मे रोजी पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे जवान राम बाबू प्रसाद सिंह गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. ते जम्मू आणि कश्मीर सीमेवर तैनात होते. पाच महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते.
त्यांच्या पार्थिवावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे. रामबाबू यांचे डिसेंबर महिन्यात लग्न झाले होते. लग्नानंतर लगेच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात ते कर्तव्यावर दाखल झाले. त्यांची पत्नी अंजली चार महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती रामबाबू यांचे सासरे सुभाष चंद्र शर्मा यांनी दिली.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शहीद रामबाबू प्रसाद सिंह यांना श्रद्धांजली वाहिली असून रामबाबू प्रसाद सिंह यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे.
कारगिलप्रमाणे पहलगाम रिव्ह्यू कमिटी नेमणार का?
1999 मध्ये तत्कालीन वाजपेयी सरकारने गारगिल युद्धानंतर रिह्यू कमिटी नेमली होती. त्याचप्रमाणे पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी रिह्यू कमिटी नेमणार का? असा सवाल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. तसेच पहलगाम हल्ल्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे अधिवेशन बोलावण्याची मागणीही लावून धरली आहे.
कुरेशींबद्दल बोलताना भाजपनेत्याची जीभ घसरली
मध्य प्रदेश सरकारचे भाजपचे मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचे वर्णन दहशतवाद्यांची बहीण असे केले. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसकडून शहा यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर विजय शहा यांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.