बीएसएफने सहा पाकिस्तानी ड्रोन पाडले; ड्रग्ज, शस्त्रास्त्रे जप्त

पाकिस्तान सरकारच्या पाठिंब्याने ड्रोनद्वारे शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाने हाणून पाडला. बीएसएफने असे 6 ड्रोन पाडले. या कारवाईत हेरॉईन, पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली.