बीएसएनएलने आणली स्वेच्छानिवृत्ती,80 हजार कर्मचारी लाभ घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारत संचार निगम लिमिटेड आणि महानगर टेलिकॉम निगम लिमिटेडने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती आणली आहे. सुमारे 80 हजार कर्मचारी या योजनेचा लाभ घेण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे 7 हजार कोटींची बचत होणार आहे. केंद्र सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएल एकत्रीकरणाच्या निर्णयासह दिलासा पॅकेज दिल्यानंतर काही दिवसांतच या दोन्ही कंपन्यांनी स्वेच्छा निवृत्तीची योजना आणली आहे.

स्वेच्छा निवृत्तीची योजना 4 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. व्हीआरएसबाबत कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी प्रादेशिक कार्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत. बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांची संख्या 1.50 लाख असून सुमारे 1 लाख कर्मचारी या योजनेसाठी पात्र असल्याची माहिती बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी.के.पुरवार यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.