मोदींची कारकीर्द ही भाजपसह देशाला लागलेला कलंक मायावतींची टीका

mayavati

सामना ऑनलाईन । लखनौ

मायावती जितका काळ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर होत्या त्याहून अधिक काळ मी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर होतो अशी टीका पंतप्रधान मोदींनी केल्यानंतर मायावतींनीही त्यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदींची संपूर्ण कारकीर्द ही भाजपसह देशाला लागलेला एक कलंक असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.

लखनौमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. बहुजन समाज पार्टी सत्तेत असताना उत्तर प्रदेशात कधीही दंगली घडल्या नाहीत. मोदी यांनी बसपाला बहेनजी समाप्ती पार्टी असे म्हणून सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याची टीकाही मायावतींनी यावेळी केली. तसेच बसपाच्या मागे लोकांचे आशीर्वाद आहेत. आम्ही सत्तेत असताना सरकारने कुठल्याही गोष्टी लपवल्या नाहीत, असेही त्या यावेळी म्हणाल्या. दरम्यान, यापूर्वी मायावती यांनी पंतप्रधान मोदींचे जहाज बुडणारे जहाज असल्याची टीका केली होती.