Budget 2019 Live- मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, 5 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
piyush-goyal-budget 2019
  • आमच्या सरकारची ‘नियत साफ, निती स्पष्ट, निष्ठा अटळ’ आहे- पियूष गोयल
  • मराठी कवितेच्या ओळींनी कोट केले
  • आयकरासंदर्भात घोषणा होताच शेअर बाजार 200 अंकांनी वधारला
  • हा अंतरिम बजेट नाही, तर देशाच्या विकासाचा मार्ग आहे
  • बँकांकडून मिळणारे व्याजाची रक्कम 40 हजार पर्यंत असल्यास करमुक्त
  • स्टँडर्ड डिडक्श्न रेट 40 हजारावरून 50 हजार करण्यात आला
  • संसदेत मोदी मोदीच्या घोषणा
  • Budget 2019 Live- मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, 5 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त
  • करदात्यांमुळे देशातील विकास कामांना गती मिळाली
  • EPF कट होणाऱ्यांना सहा लाखांचा विमा
  • 2030 पर्यंत आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडणार
  • 2022 पर्यंत स्वदेशी उपग्रह अंतराळात पाठवणार
  • हिंदुस्थान उपग्रह प्रक्षेपणाचे जगातील सर्वात मोठे केंद्र बनले आहे
  • महागाई 10 टक्क्यावरून 4 टक्क्यांवर आणली
  • जय जवान, जय किसान सोबतच जय गरीब इंसानवर मोदी सरकाराचे लक्ष्य
  • केवळ 59 मिनिटांत एक कोटीचे कर्ज
  • व्यावसायिकांना कर्ज सहज उपलब्ध होणार
  • हिंदुस्थान अन्य देशांसाठी सॅटेलाईट लॉन्च करण्याचा प्लॅटफॉर्म बनला आहे
  • गंगा स्वच्छतेसाठी मोठे काम सुरू आहे
  • 2030 पर्यंत सरकार देशातील सर्व नद्या स्वच्छ करण्यासाठी प्रतिबद्ध
  • जगातील मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये हिंदुस्थानचा समावेश होणार
  • उज्वला योजनेअंतर्गत 6 कोटी जनतेला एलपीजी कनेक्शन दिले
  • नोटाबंदी नंतर 1 लाख 36 हजार कोटीचा कर देशाला मिळाला
  • नोटाबंदीमुळे पहिल्यांदा 1 कोटी पेक्षा अधिक लोकांनी कर भरला
  • आमचे सरकार काळापैसा मिटवूनच राहणार
  • घर खरेदी करणाऱ्यांसाठी जीएसटी कमी करण्यावर विचार सुरू आहे
  • जानेवारी महिन्यात जीएसटीतून सरकारला अधिक मोठी रक्कम मिळणार, 1 लाख कोटी पार करणार
  • जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणावर कर जमा झाला आहे
  • जीएसटीमुळे देशाचे भले झाले
  • गरीबांचे भले करण्यासाठी याचा वापर करण्यात आले आहेत
  • 12 लाख कोटी रुपये आयकरातून जमा झाले
  • 24 तासांत रिटर्नवर प्रक्रिया केली
  • आयकर परतावा भरणाऱ्य़ांची संख्या 80 टक्क्यांनी वाढली
  • आयकर प्रक्रिया अधिक सोपी केली
  • मोबाईल आणि मोबाईल पार्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची संख्या दोनावरून 256 वर गेल्या आहे
  • कॉल व डेटा रेट्स हे जगात सर्वात स्वस्त हिंदुस्थानात आहेत
  • आधारला वैश्विक स्तरावर ओळख मिळाली आहे
  • जनधन अंतर्गत 34 कोटी खाते पाच वर्षात उघडण्यात आले
  • सरकार विभागात SME मधून 25 टक्के सामान खरेदी केले जाणार
  • दररोज 27 किलोमीटरचे महामार्ग बांधले जात आहेत
  • हिंदुस्थान सर्वांत जलदगतीने महामार्गांचा विकास करणारा देश बनला आहे
  • MSME सेक्टर वाढवण्यासाठी महत्वाची पाऊले उचलली, केवळ 59 मिनटात एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले
  • सरकारने देशाला स्टार्ट अप मध्ये दुसरा मोठा देश बनवले आहे
  • सरकारी नोकऱ्यांवर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या कमी केली
  • स्टार्ट अप इंडियामुळे देशाच्या  अर्थव्यवस्थेला मोठी मदत झाली
  • PMKVY एक कोटी तरुणांना ट्रेनिंग दिले
  • वन रँक वन पेन्शन अतंर्गत जवानांवर 35 हजार कोटी खर्च केले आहेत
  • लष्कराचे बजेट 3 लाख कोटींनी वाढले
  • उज्ज्वला योजनेंतर्गत ८ कोटी गॅसजोडणी देणार: गोयल
  • गर्भवती महिलांसाठी पीएम मातृत्व योजना आणली आहे
  • EPF मध्ये सरकार गुंतवणूक वाढवणार
  • किमान मासिक वेतन 3000 रुपये देणार
  • असंघटीत कामगारांना 7 हजाराचा बोनस मिळणार
  • 21 हजार पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस मिळणार
  • 10 कोटी असंघटीत कामगारांना लाभ मिळणार
  • असंघटीत कामगारांसाठी महत्वाची घोषणा
  • महिना 15000 रुपये कमाई असणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार
  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेला मंजुरी दिली
  • ग्रॅच्युटीची मर्यादा 10 लाखापासून 20 लाख केली
  • कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास अडीच लाखांऐवजी 6 लाख रुपयांची आर्थिक मदत
  • कामगारांचे कल्याण हाच आमच्या सरकारचा हेतू
  • पशूपालन आणि मत्स्य व्यवसायासाठी
  • कामधेनू योजनेवर 750 कोटींचा खर्च होणार
  • गायींसाठी सरकारची पहिल्यांदाच मोठी योजना, कामधेनू योजना सुरू करणार
  • गायींसाठी सरकार मागे राहणार नाही
  • 12 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार, 75 हजार कोटी खर्च होणार आहे
  • 1 डिसेंबर 2018 पासूनची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार
  • पीएम किसान सन्मान योजनेला मंजुरी दिली आहे, डायरेक्ट इन्कम सपोर्ट नुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रति वर्षी 6000 रुपये मिळणार
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आम्ही काम केले आहे
  • आम्ही विकासाचे टार्गेट ठेवून ग्राम सुधारणा करण्यास सुरुवात केली
  • हरयाणामध्ये AIIMS उभारण्याचे काम सुरू आहे
  • आयुषमान भारत योजनेमुळे नागरिकांचे 3 हजार कोटी रुपये वाचले
  • लाखों गरीबांना औषधे प्रधानमंत्री जन औषधी केंद्रातून स्वस्तात औषधे दिली गेली आहेत, दिली जात आहेत
  • आयुषमान भारत योजनेत 10 लाख लोकांवर उपचार करण्यात आले
  • प्रत्येक व्यक्तीच्या घरात प्रकाश यावा म्हणून बल्ब उपलब्ध करून दिली
  • प्रत्येक गावात वीज आमच्या सरकारने पोहोचवली
  • आमचे उद्देश आहे की गावाचा आत्मा कायम ठेवतानाच त्यांना शहरासारख्या सोयी देखील मिळाव्या
  • अन्नधान्य सर्वांना मिळावे म्हणून आम्ही आवश्यक ती सर्व पाऊले उचलली
  • आर्थिक आधारावर गरीबांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे
  • रेरा, आणि बेनामी संपत्ती कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी मदत करणारे ठरले आहे
  • स्वच्छ भारत अभियान हे आता सरकारी आंदोलन राहिले नाही, ते लोकांनी स्वीकारलेले आंदोलन आहे
  • शेअर बाजार 120 अंकांनी वधारला आहे
  • मोठ्या उद्योजकांवरही कर्ज परत करण्याचा दबाव निर्माण झाला आहे
  • एनपीए बाबत बँकांची खरी परिस्थिती लोकांसमोर आणा हे आरबीआयला सांगण्याची आमची हिम्मत होती
  • डिसेंबर 2018मध्ये चलनवढीचा दर हा फक्त 2.1 टक्के होता
  • वित्तीय तूट 3.4 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आम्हाला यश आले
  • महागाईवर आम्ही नियंत्रण मिळवलं
  • ‘हमारी सरकारने कमरतोड महंगाई की कमर तोड दी’
  • 2022 पर्यंत आमचे सरकार सर्वांना घरे देणार
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार
  • देशातील भ्रष्टाचार नष्ट केला
  • आज देश जगातील सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश झाला
  • सरकारने देशाची प्रतिमा पुन्हा चांगली केली
  • विरोधकांकडून आवाज-गोंधळ
  • अंतरिम बजेट मांडण्यास सुरुवात करत आहे
  • पियूष गोयल बजेट मांडण्यासाठी उभे राहिले
  • संसदेच्या कामकाजाला सुरुवात
  • टीडीपीच्या खासदारांचे संसदेच्या प्रांगणात जोरदार आंदोलन, विशेष राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू

  • आज केवळ ‘जुमला’ असणार आहे: मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस
  • निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बजेटमध्ये लोकप्रिय घोषणा करतील: मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस
  • थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर होणार
    • केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पाला मंजुरी

  • केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पासंदर्भात बैठक सुरू
  • पियूष गोयल संसदेत पोहोचले

  • राष्ट्रपतींची भेट घेऊन पियूष गोयल संसदेकडे रवाना

  • अर्थसंकल्पाची कागदपत्रे संपूर्ण सुरक्षेत संसदेच्या परिसरात आणली गेली

 

  • अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी संसदेत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार
  • पियूष गोयल अर्थमंत्रालयात पोहोचले