
सामना प्रतिनिधी, मुंबई
माटुंगा येथे एका बांधकाम व्यावसायिकाने लक्ष्मी निकेतन टॉवरच्या 15 व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुकेश सावला (55) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. सावला हे कुटुंबीयांसोबत लक्ष्मी निकेतन टॉवरमध्ये राहत होते. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून खाली उडी टाकली. रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या सावला यांना लगेच शीव रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी माटुंगा पोलीस अधिक तपास करीत आहेत.




























































