
सामना ऑनलाईन । रत्नागिरी
शहरातील सोनार गल्ली येथे एक जुनी इमारत दुपारी २.३० वाजता कोसळली. या इमरतीचे दुरूस्तीचे काम चालू असतान ही दुर्घटना घडली. तीन कामगार दुर्घटनेवेळी इमरातीत होते. पण सुदैवाने तिघेही या दुर्घटनेतून बचावले.
शहरातील सोनार गल्ली मध्ये कै. वामन शेट्ये यांचे दुकान या नावाने प्रसिद्ध असलेली पन्नास ते साठ वर्षापूर्वीची स्लॅबची इमारत होती. काही वर्षांपूर्वी या दुकानाला मोठी आग लागली होती. तरी देखील ही इमारत आजपर्यंत दिमाखात उभी होती. काही महिन्यांपूर्वी सदरील इमारत सतियादेवी हिरालाल देवासी यांना विकण्यात आली होती.
या इमारतीचे आतील दुरुस्तीचे काम काम चालू होते. बुधवारी देखील हे काम चालू असताना अचानक दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास आवाज आल्याने आतमध्ये काम करत असलेले कामगार बाहेर पडले आणि क्षणार्धात सदरील इमारतीचा पुढील भागाचा स्लॅब व वरील छताचा अर्धा भाग अचानक कोसळल्याने मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला असलेले नागरीक धावत गेले. या दुर्घटनेमुळे ३० लाखाचे नुकसान झाले आहे. सध्या तुटलेला स्लॅबचा भाग फोकलॅडने दुर करण्याचे काम चालू आहे . नगरपंचायतीने मालक सतियादेवी यांना धोकादायक इमारत तोडून टाकण्याची नोटीस बजावली आहे.



























































