गुजरातच्या वडोदरामध्ये इमारत कोसळली; सातजण अडकल्याची भीती

813

गुजरातमधील वडोदराच्या छानी भागात शनिवारी एक जुनी इमारत कोसळण्याची घटना घडली आहे. महापालिकेकडून ही इमारत पाडण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी ही इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली सात मजूर दबल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत या घटनेत जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. याआधी सप्टेंबर महिन्यात अहमदाबादमधील आमरायवाडी भागात एक तीन मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या