बुलडाण्यात नाकाबंदी, संपूर्ण शहराचीच होणार प्राथमिक तपासणी!

3303

कोरोना संबंधित पहिला पॉझिटिव्ह रुग्ण बुलढाण्यात सापडला, पण तो मृत्यूनंतर. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या पृष्ठभूमीवर पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज 30 मार्च रोजी त्यांचा वाढदिवस असतानाही तो साजरा न करता व कोणाचाही पुष्पगुच्छ न स्वीकारता तोंडाला मास्क लावून थेट प्रशासकीय बैठक घेतली व यातून अनेक निर्देश दिले.

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज सोमवार ३० मार्च, सोमवारी तातडीने आढावा बैठक घेत जिल्ह्याची परिस्थिती जाणून घेतली. बुलडाणा येथील न्युमोनियाने मृत पावलेल्या व्यक्तीचा स्वॅब रिपोर्ट कोविड १९ पॉझिटिव्ह आल्याने जिल्हाभरात उडालेल्या खळबळीच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशही दिले. तर या घटनेमुळे नागरिकांनी घाबरु नये व शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहनही केले. यावेळी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखानंद राजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. सा. वा. सांगळे आदि उपस्थित होते.

आढावा बैठकीनंतर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व आ. संजय गायकवाड यांनी जनतेने घाबरुन न जाता सोशल डिस्टनसिंग पाळून कोविड १९ विरोधात लढण्यासाठी शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या