बारावीत 80 टक्के गुण मिळवूनही केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केवळ इंग्रजी विषयात कमी गुण मिळाल्याने एकूण गुण 80 टक्के असताना ही बाराविच्या शेतकरी कुटुंबातील एकुलत्या मुलाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. मुलाने उचललेल्या या पावलामुळे कुटुंबातील लोकांना धडकी भरली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना चिखली तालुक्यातील कव्हळा येथे 17 जुलैच्या सकाळी 6 वाजताच्या सुमारास समोर आली.

विनायक संतोष लांडे (वय 18) असे मृतक मुलाचे नाव असून त्याने कॉमर्समधून इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्याला 79.38 टक्के गुण प्राप्त झाले होत. परंतु या परीक्षेत इंग्रजी या विषयात 56 गुण मिळाल्याने तो निराश झाला. त्यास ते गुण कमी वाटत असल्याने तो नैराश्यात गेला. याच तणावातून शुक्रवारी सकाळी 6 वाजे दरम्यान तो आपल्या शेतात निघून गेला व शेतातील आंब्याच्या झाडाला त्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.