बुलढाणा – 33 कोरोना अहवाल निगेटिव्ह, 3 पॉझिटिव्ह

741

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 36 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 33 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेले अहवाल मलकापूर येथील 27 वर्षीय व 50 वर्षीय महिला आणि 10 वर्षीय मुलाचा आहे. सदर अहवाल यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील आहेत.

आतापर्यंत 1236 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 59 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 33 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रूग्णालयात 23 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या