बुलढाणा जिल्हयात 75 अहवाल पॉझिटिव्ह, 45 रूग्णांची कोरोनावर मात

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 414 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 339 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 75 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 56 व रॅपिड टेस्टमधील 19 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 121 तर रॅपिड टेस्टमधील 218 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 339 अहवाल निगेटीव्ह आहेत.  तसेच आज उपचारादरम्यान निंभोरा, ता. जळगांव जामोद येथील 75 वर्षीय पुरूष रूग्णाचा खामगांव कोविड केअर सेंटर येथे मृत्यू झाला आहे. तसेच आज 45 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

अद्याप 383 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 8394 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1209 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 744 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 436 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 29 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या