आषाढधारांनी बुलढाणा जिल्हा चिंब..! सरासरी 21.2 मि.मी पावसाची नोंद

431

जिल्ह्यातील पुर्वेला असणाऱ्या खामगांव, शेगाव व मेहकर तालुक्यांमध्ये रात्री पासून कमी अधिक पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आज सकाळपासूनच सर्वदूर आषाढधारांनी वर्षाव करीत बळीराजाला सुखावले आहे. दमदार पावसामुळे खरीपातील पिके डौलाने डोलत आहेत. तालुक्यातील अन्य तालुक्यांमध्येही पावसाने आपले अस्तित्व दाखवित चांगलीच बॅटींग केली आहे. मोताळा तालुका वगळता जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 21.02 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच शेगाव तालुक्यात जवळा बु. येथे पुरात वाहून एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची

बुलडाणा : 4.1 मि.मी (308.2), चिखली : 7.2 (262.8), दे.राजा : 3.6 (236.4), सिं. राजा : 10.6 (309.2), लोणार : 6 (255.6), मेहकर : 15.5 (253.1), खामगांव : 40.3 (203), शेगांव : 108.8 (306.2), मलकापूर : 4.2 (346.6), नांदुरा : 22.2 (280.1), मोताळा : निरंक (167.6), संग्रामपूर : 46.4 (369.8), जळगांव जामोद : 6.6 (293.8)

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3592.4 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 576.3 मि.मी आहे. सर्वात जास्त 108.8 मि.मी अतिवृष्टीची नोंद शेगांव तालुक्यात झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या