
बुलढाण्यातील मेहकरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे समृद्धी महामार्गाच्या मेहकर इंटरचेंजवरील पाण्याचा निचरा झाला असून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी अखेर खुला झाला आहे.
समृद्धी महामार्ग खामगावकडून मेहकरकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग दोन दिवसांपूर्वी पाण्याखाली होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाकडून समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या रॅम्पवर पाणी आले होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी दुपारी दीड तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मेहकर इंटरचेंज येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. समृद्धी महामार्गाच्या मुख्य ‘कॅरेज वे’मध्ये पाणी आलेले नव्हते असे रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.