आज शिक्षणाचा धंदा सुरू आहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। बुलढाणा

शाळेची इमारत म्हणजे केवळ दगडविटांचे भवन नसून त्या इमारतीमध्ये समाजबांधणी करणारे, माणुसकी जपणारी माणसे तयार झाली पाहिजेत. विद्येबरोबर विवेक आला पाहिजे. आज शिक्षणाचा धंदा सुरू आहे. पोटभरू शिक्षण न देता मूल्याधारित शिक्षण देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

चिखली येथील आदर्श विद्यालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा आज भागवत यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे अध्यक्ष, रामकृष्ण दादा शेटे यांच्यासह 1008 स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज आदी उपस्थित होते. भागवत म्हणाले की, केवळ पोट भरण्यासाठी दिले जाणारे शिक्षण उपयोगाचे नाही तर शिक्षणातून सुसंस्कारी व संस्कृत माणूस घडला पाहिजे. त्यामुळे शाळेत शिक्षण देताना उत्तम विद्यार्थी घडविणारे, समाजाची बांधणी करणारे शिक्षण देणे गरजेचे आहे. विद्या, धन व शक्ती धारण करणाऱया व्यक्तींनी यांचा उपयोग समाजहितासाठी करणे गरजेचे आहे.