
सामना प्रतिनिधी। बुलढाणा
वैनगंगा ते नळगंगा या महत्वाच्या नद्यांना जोडणार्या नदी जोड प्रकल्पाबाबत प्रक्रिया सुरु झाली असून ब्रह्मपुत्रेचे पाणी वैनगंगा मार्गे नळगंगा नदीत आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचा कायापालट होईल असे प्रतिपादन शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.
धामणगाव बढे (ता. मोताळा) येथे मंगलकार्यालयात आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ते रविवार १३ रोजी बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी मोताळा तालुका शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पुजनाने झाली. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव यांनी सर्व विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. युती होवो अथवा न होवो, उमेदवार कोणीही असो शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. शिवसेनेची लढत भारीपशी असून राष्ट्रवादीने जि.प.मध्ये काँग्रेसशी बेइमानी केल्याचे त्यांना परिणाम भोगावे लागणार असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड यांनी बुलढाणा मतदारसंघावर फडकत असलेला भगवा कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे. विधानसभेचा निर्णयानंतर पहिले होऊ घातलेल्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करुन खासदार प्रतापराव जाधव यांना विजयी करण्याचे आवाहन केले. जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी पक्षसंघटन मजबूत करण्यावर भर देवून, कामाला लागण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास चौथनकर यांनी केले तर याप्रसंगी प्रविण निमकर्डे, डॉ. मधुसुदन सावळे, लहासे गुरुजी, भोजराज पाटील, चंदाताई बढे, युवासेना जिल्हाधिकारी ऋषी जाधव, बाळासाहेब कोरके, किशोर भोसले, अशोक गव्हाणे यांची समायोचित भाषणे झाली. यावेळी मोताळा तालुक्यामधील युवासेनेच्या नियुक्त्या खासदार प्रतापराव जाधव, ऋषी जाधव यांच्याहस्ते करण्यात आल्या. कोर्हाळा येथील भागवत गायकवाड व मोताळा येथील आरीफ खाटीक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. यावेळी व्यासपीठावर अशोक इंगळे, धीरज लिंगाडे, प्रकाश जाधव, डॉ. रविंद्र महाजन, भागवत दराखे, राजु बोरसे, सुखदेव शीपलकर, कुंवरसिंह परमार, बाळासाहेब नारखेडे, विश्वंबर लांजुळकर, लखन गाडेकर, विजय सुरळकर, रोहीत खेडेकर, उमेश कापुरे, तेजराव पाटील, श्रीराम पाटील, राजेश अढाव उपस्थित होते. यावेळी राजु मोदे, शुभम घोंगटे, गुलाबराव शिराळ, महादेव शिराळ, राजेश पडोळकर, रामशंकर सोनोने, अशोक जाधव, अनिल दांडगे, निलेश बढे, काशिनाथ पाटील, गजानन सपकाळ, यादवराव हुडेकर, अनिल किरोचे, काशिनाथ बिचकुले, रमेश पाटील, रणजित राजपूत, यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.































































