‘बुलेट ट्रेन’ प्रकल्प रद्द करा! काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प सवा लाख कोटी खर्च करून प्रकल्प आणायला कुणी सांगितलं होतं. महाराष्ट्राच्या माथी हा भलामोठा प्रकल्प कशासाठी लादण्यात आला. असे निर्णय अपाण मान्य करायचे. त्यामुळे ‘बुलेट ट्रेन’सारखे प्रकल्प रद्द केले पाहिजेत हे माझे प्रामाणिक मत आहे. फडणवीस सरकारने जे चुकीचे निर्णय घेतले आहेत. ते बंद करावे लागतील. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भूमिका मांडणार आहे, अशी प्रतिक्रिया काँगेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्यक्त केली.

बुलेट ट्रेनबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडली. ते म्हणाले, पुण्याला हायपरलूप आणून अर्ध्या तासात प्रवासी वाहतूक करू म्हणून सांगितलं आहे. पण याचा कोणी प्रोजेक्ट रिपोर्ट तरी तयार केला आहे का? फडणवीस सरकारने महाराष्ट्रावर लादलेले बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प रद्द केले पाहिजेत हे माझं प्रमाणिक मत आहे. या प्रकल्पाची प्राथमिकता कोणी ठरवली याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मी माझं मत मांडणार आहे. मुंबईच्या लोकांना ही बुलेट ट्रेन अहमदाबादला जाण्यासाठी लागणार आहे का? तिकीट किती असणार आहे? किती कर्ज घ्यावा लागणार आहे? त्यामुळे अशा निर्णयांचा पुनर्विचार करायलाच हवा.

माझ्या अनुभवाचा पक्षाला जो फायदा घ्यायचा असेल त्यासाठी मी तयार आहे!

पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रीपदाविषयी विचारलं असता ते म्हणाले, मी महाराष्ट्राचं नेतृत्व पावणेचार वर्षं केलेलं आहे. सोनिया गांधींनी मला अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. पक्षाचा प्रभारी म्हणून कार्यभार सांभाळला. दिल्लीत मंत्रीपद दिलं, महाराष्ट्रात मुख्यमंत्री केलं. त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठाr हे सरकार टिकलं पाहिजे असाच निर्णय घेतील. माझी माझ्या नावाबद्दल तसेच खात्याबद्दल कुणाशीही चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं याचा निर्णय दिल्लीत सुरू आहे. याची प्रक्रिया एक ते दोन दिवसांत संपेल. तेव्हा कोण कोण मंत्रिमंडळात आहे ते कळेल. माझ्या अनुभवाचा जो काही फायदा घ्यायचा असेल त्यासाठी मी तयार आहे.