मुंबई गोवा महामार्गावर कोलेटीजवळ बर्निग कारचा थरार; प्रवासी बचावले

684

मुंबई गोवा महामार्गावर वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोलेटी गावाच्या हद्दीत टोयोटा कारला अचानक आग लागली. गाडीला आग लागल्यावर प्रवासी तातडीने उतरल्यामुळे चे बचावले आहेत. जेएसडब्लूच्या अग्निशमन दलाने कारला लागलेली आग विझवली. मसूद अहमद सिद्दीकी चिपळूणहून टोयोटा कारने तीन प्रवाशांसह मुंबईकडे निघाले होते. सायंकाळी मुंबई गोवा महामार्गावर कोलेटी गावाच्या हद्दीत कार आल्यावर इंजिनातून अचानक धूर निघण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी अचानक कारला आगे लागली. कारने पेट घेतल्यावर कारमालक मसूद आणि इतर तीन प्रवाशांनी प्रसंगावधान राखत कारमधून बाहेर पडले. त्यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत.

घटनेची माहिती मिळताच वडखळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जेएसडब्लू कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझविण्यात आली. मात्र, कारने पेट का घेतला याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आगीमुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी याच मार्गावर एसटी बस आणि प्रवासी कारचा अपघात होऊन चारजण ठार झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या