वेळ न पाळता फटाके उडवले, मुंबईत पहिली तक्रार दाखल

105

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रदूषण रोखण्यासाठी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर रात्री 8 ते रात्री 10 या वेळातच फटाके उडवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र याबंधनाला सुरूंग लावत रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवल्याबद्दल दोन अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबईतील मानखुर्दच्या काही भागात रात्री उशिरापर्यंत फटाके वाजण्यात आले. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या