ओडिशामध्ये एका बसला भीषण अपघात झाला आहे. बस विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 40 प्रवासी जखमी झाले आहेत.
Odisha: At least 6 persons dead and around 40 passengers injured after the bus they were travelling in caught fire after coming in contact with 11 KV live electric wire in Ganjam district, Brahmapur. Injured persons have been sent to MKCG Medical College and Hospital. pic.twitter.com/MFB6YsOIqN
— ANI (@ANI) February 9, 2020
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जंगलपाडू ते चिकरादा दरम्यान जाणारी बस 11 किलो वॅट विजेच्या तारांच्या संपर्कात आली. त्यामुळे बसला आग लागली. त्यामुळे सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. सर्व लोक जवळच्या गावातील साखरपुड्यासाठी आले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी बचाव कार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघात 40 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.




























































