बस चालवताना चालकाला आला हृदय विकाराचा झटका; बसचा अपघात, सुदैवाने प्रवासी सुखरुप

मुंबईत बस चालवताना चालकाला तीव्र हृदय विकाराचा झटका आला. त्यात बस चालकाने प्रसंगावाधन राखले. बसचा अपघात झाला असून प्रवासी सुखरूप आहेत.

381 क्रमाकांची बस घाटकोपर पूर्व ते चेंबूरच्या टाटा पॉवर स्टेशन दरम्यान धावते. आज सकाळी हरिदास पाटील ही बस चालवत होते. बस चालवताना वसंत पार्क जवळ पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला. तरी पाटील यांनी प्रसंगावधान दाखवले. बस एका सिग्नला धडकली. त्यात बसचे नुकसान झाले असले तरी सर्व प्रवासी सुखरुप आहेत. पाटील यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या