पालिकेच्या इलेक्ट्रिक बस खरेदीत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्ट्रिक बस खरेदीच्या निविदा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेच्या इलेक्ट्रिक बस खरेदीच्या संदर्भात अमित साटम व अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. या निविदा प्रक्रियेत पेंद्रीय सतर्कता आयोगाच्या (सीव्हीसी) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झालेले नाही असे बेस्ट प्रशासनाने कळवले आहे. निविदा प्रक्रियेतील पात्रता अट बदलल्यास सीव्हीसीच्या तत्त्वानुसार पुरेशी मदत घ्यावी लागते, पण इलेक्ट्रिक बसच्या निविदेमध्ये या तत्त्वांचे उल्लंघन झालेले नाही, असेही बेस्ट प्रशासनाने कळवले नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.