वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान बुधवार, गुरुवार खुले

मुंबईकर, पर्यटक आणि बच्चे कंपनीला दिवाळी सुट्टीचा आनंद घेता यावा यासाठी दिवाळी सण कालावधी दरम्यान सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशी 22 व 23 ऑक्टोबर रोजी पालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय खुले राहणार आहे. ‘बलिप्रतिपदा दीपावली पाडवा’निमित्त 22 ऑक्टोबर व ‘भाऊबीज’निमित्त 23 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे तर दर बुधवारी उद्यान बंद असते. मात्र या दोन्ही दिवशी उद्यान व प्राणी संग्रहालय खुले राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.