
सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जिंकली आहे. ते देशाचे १७ वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी आज मतदान झालं. मतदानानंतर संध्याकाळी मत मोजणी करण्यात आली.
या निवडणुकीत एकूण ७६७ खासदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीच्या वेळी ७५२ मते वैध आढळली आणि १५ मते अवैध घोषित करण्यात आली. सीपी राधाकृष्णन यांना ४५२ पहिल्या पसंतीची मते मिळाली. या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला. रेड्डी यांना ३०० मते मिळाली.