सीए परीक्षा 3 ते 22 सप्टेंबरदरम्यान होणार

सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने आज हे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार 3 ते 22 सप्टेंबर या कालावधीत सीए परीक्षा होणार आहेत. या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 जुलैपासून सुरू होणार आहे. उमेदवार विलंब शुल्काशिवाय 18 जुलैपर्यंत अर्ज करू शकणार आहेत, तर विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै असणार आहे.