तणावाचे वातावरणात असताना का करण्यात येतो ‘फ्लॅग मार्च’… वाचा सविस्तर

779

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. तर काही राज्यात हिंसाचार वाढल्याने कलम 144 लागू करण्यात आले आहे. काही ठिकाणी कलम 144 लागू केल्यानंतरही कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असते किंवा शांततेला धोका असतो, अशा ठिकाणी पोलीस आणि सुरक्षा दलाकडून ‘फ्लॅग मार्च’ करण्यात येतो. त्यामुळे जनतेत विश्वास निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होते.

कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असेल कलम 144 लागू करण्यात आल्यानंतरही परिसरात तणावाचे वातावरण असेल, अशावेळी जनजीवन पूर्वपदावर आणणे गरजेचे असते. कलम 144 लागू झाल्यावर 4 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई असते. त्यानंतरही कायदा सुव्यवस्थेला धोका असल्याची शक्यता असल्यास किंवा अनुचित घटनेची शक्यता असल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर जनतेचा विश्वास कायम रहावा, यासाठी फ्लॅग मार्च करण्यात येतो, असे उत्तर प्रदेश पोलीस महासंचालक (सुरक्षा) दीपेश जनुजा यांनी सांगितले. जनतेत विश्वास निर्माण करून सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी पीएसी, सुरक्षा दल किंवा अर्धसैनिक दलाचे जवान तणाव असलेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली फ्लॅग मार्च करतात. आपल्या राष्ट्रीय ध्वजातील प्रत्येक रंग महत्त्वपूर्ण असून सौहार्द, राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश त्यातून मिळतो. त्यामुळे तणावपूर्ण वातावरणात जनतेत राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी फ्लॅग मार्च करण्यात येतो. ध्वज या शब्दावरून करण्यात येणाऱ्या संचलनाला फ्लॅग मार्च हा शब्द रुढ झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या