‘सीएए’विरोधातील ‘बंद’ला हिंसक वळण पश्चिम बंगालमध्ये  2 ठार, बिहारमध्ये 15 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सीएए’ व ‘एनआरसी’ विरोधात पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला देशभरात हिंसक वळण लागले. भारतीय नागरिक मंचातर्फे पश्चिम बंगालमध्ये पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान दोघेजण ठार झाले तर बिहारमध्ये सीएए समर्थक व विरोधकांत झालेल्या हाणामारीत 15 जण जखमी झाले. महाराष्ट्रातही काही शहरांत या देशव्यापी बंदचे पडसाद उमटले. सांगली, धुळे या ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या. मुंबईत कांजुरमार्ग स्थानकात रेल रोको करण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. पालघरमध्ये पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि किकिध संघटनांतर्फे सीएए, एनआरसीला विरोध करण्यासाठी बुधवारी देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून काही ठिकाणी हिंसक कळण लागल्याचे पाहायला मिळाले. संभाजीनगरमध्ये मुस्लिमबहुल भागात बंदला प्रतिसाद मिळाला. धुळ्यात चाळीसगाव रोडवर जमावाकडून तुफान दगडफेक झाली. पोलिसांची दुचाकी वाहनेही जाळली. हवेत तीन वेळा गोळीबार करण्यात आला तर एक दोन ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला.

पालघर, सांगली, अकोल्यात लाठीमार

पालघरमध्ये बंदकेळी दुकाने बंद करण्यास व्यापार्‍यांनी नकार दिल्याकरून वाद निर्माण झाला होता. वायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. सांगलीतील मिरजमध्ये तरुणांनी रिक्षाच्या काचा फोडल्या. मिरजेतील कॅन्सर रुग्णालयासमोरील रस्त्यावर तरुणांनी जबरदस्तीने रिक्षा वाहतूक बंद केली. पोलिसांनी रिक्षांची तोडफोड करणार्‍या तरुणांना चांगलाच चोप देऊन ताब्यात घेतले. अकोल्यात पातूर शहरात संतप्त जमावाने एका खासगी मालकाहू वाहनाच्या काचा फोडल्यात, तर काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. ‘औरंगाबाद बंद’मध्ये शहरातील बहुतांश दुकाने बंद होती. शहरातील मुस्लिमबहुल भागात बंदला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बफेक

सीएएविरोधातील आंदोलनालादरम्यान पश्चिम बंगालमध्ये दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान आंदोलकांनी गावठी बॉम्ब फेकले. तसेच गोळीबारही करण्यात आला. यात दोन जण ठार झाले तर एकजण जखमी झाल्याची माहिती पोलीस अधिकार्‍यांकडून देण्यात आली. पश्चिम बंगालच्या पार्क सर्कस मैदानात सीएएविरोधात 60 मुस्लिम महिलांनी धरणे आंदोलन सुरू केले असून बुधवारी 23 व्या दिवशीही त्यांचे आंदोलन सुरूच होते.

धुळे : चाळीसगाव रोडवर जमावाकडून तुफान दगडफेक.

नंदुरबार : बंदला संमिश्र प्रतिसाद.

अकोला : आंदोलकांनी गांधी रोडवरील दुकाने बंद केली.

यवतमाळ : शहरातील बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन.

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने.

जळगाव : भुसावळ आणि तंबापूर भागात दगडफेक.

नगर : शिवाजी महाराज चौकात विविध संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन.

लातूर : बंदला संमिश्र प्रतिसाद, व्यापार्‍यांनी सहभाग घेतला नाही.