
देवेंद्र फडणवीस सरकारच्या 2015 ते 2018 पर्यंत झालेल्या कामांचा हिशेबच मिळत नाही. या काळात झालेल्या 65 हजार 921 कोटींचे कामे योग्य रीतीने पूर्ण झाल्याची 32 हजार 570 प्रमाणपत्रेच देण्यात आलेली नाहीत. यामुळे हा निधी नेमका कोणत्या विभागांसाठी वापरला गेला याचा ताळमेळच लागत नसून यामध्ये निधीचा दुरुपयोग तसेच अफरातफरी झाल्याचा संशय कॅगने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.
विधानसभेत आज कॅगचा अहकाल सभागृहात मांडण्यात आला. किधानसभेत शुक्रवारी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅगचा राज्य वित्त व्यवस्थेवरील लेखापरीक्षण अहवाल सादर केला. राज्य सरकारकडून हाती घेण्यात आलेले विविध प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे काम पूर्ण झाल्याचे उपयोगिता प्रमाणपत्र 12 महिन्यांच्या आत द्यावे लागते. मात्र राज्यात 2018 पर्यंत विविध कामांसाठी दिलेली ही प्रमाणपत्रेच सादर झालेली नाहीत. यामध्ये नगरविकास विभागाची सर्वाधिक 46 टक्के प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत. त्यापाठोपाठ, शालेय शिक्षण व क्रीडा आठ टक्के, नियोजन 8 टक्के कामांची प्रमाणपत्रे देण्यात आलेली नाहीत.
उपयोगिता प्रमाणपत्रांची स्थिती
- 2015-2016 वर्षात 13067 उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्यात आली नाहीत. या कामांची किंमत 28894 इतकी आहे.
- 2016-17 वर्षात 4027 उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्यात आली नसून कामांची किंमत 12301 इतकी आहे.
- 2017-2018 वर्षात 15476 उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्यात आली नसून कामांची किंमत 24, 725 आहे.
83 हजार 495 कोटी खर्चूनही प्रकल्प पूर्ण नाहीत
राज्यात 412 प्रकल्पांची किंमत 74 हजार 73 कोटींवरून 1 लाख 89 हजार 408 कोटींवर पोहोचली आहे. पण प्रत्यक्षात आतापर्यंत 83,495 कोटी खर्चूनही प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे चालू प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे. नकीन कर्ज घेताना राज्य सरकारने आर्थिक शिस्तीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना कॅगने दिल्या आहेत. तसेच भांडकली खर्च, वित्तीय तूट लक्षात घेऊन कर्ज घेण्याचा सल्ला कॅगने दिला आहे. कर्मचाऱयांच्या पगारासाठी खर्च काढत असल्याचे निरीक्षणही कॅगने आपल्या अहवालात केले आहे.
असे फेडावे लागणार कर्ज, वर्ष रक्कम
- 2018-19 23 हजार 88 कोटी
- 2019-21 40 हजार 739 कोटी
- 2021-23 60 हजार 921 कोटी
32 सार्वजनिक उपक्रम तोटय़ात, 49 हजार 192 कोटी तोटा
राजकीय सोय म्हणून पाहिली जाणारी तोटय़ातील वैधानिक महामंडळ, ग्रामीण बँका, संयुक्त कंपन्या, सहकारी आणि विभागीय वाणिज्यिक उपक्रम बंद करण्यासाठी पावले उचलावीत अशी शिफारस कॅगने केली आहे. 31 मार्च 2018 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत 32 सार्वजनिक उपक्रम तोटय़ात होते आणि त्यांचा निक्कळ तोटा हा 49 हजार 192 कोटी इतका होता, असे कॅगने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर तोटय़ातील उपक्रमांचे सरकारने पुनर्विलोकन करावे, असे उपक्रम बंद करण्यासाठी अथवा त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने पावले उचलावीत, असा सल्ला कॅगने दिला आहे.
नवीन कर्ज जुन्या कर्जाचे व्याज देण्यावर नवीन कर्जाचा बहुतांश भाग केवळ जुन्या कर्जाचे व्याज देण्यावर खर्च होत असल्याची गंभीर बाब कॅगने निदर्शनास आणली आहे. 2013-14 ते 2017-18 या काळात सरासरी 39 हजार 600 कोटी रुपयांचे नवे कर्ज घेण्यात येत होते. यातील सरासरी 34 हजार 797 कोटी रुपये जुन्या कर्जाचे व्याज फेडण्यासाठी खर्च होत होते, याचाच अर्थ नवीन कर्जातील तब्बल 88 टक्के रक्कम जुन्या कर्जाचे व्याज देण्यासाठी खर्च होते. कर्जाची अकघे बारा टक्के रक्कम विकासकामांवर खर्च होत होते याबाबत कॅगने चिंता व्यक्त केली आहे.
विधिमंडळाच्या मान्यतेशिवाय खर्च
कॅगने 2014-15 ते 2016-17 या तीन वर्षांत झालेला 4550 कोटी रूपयांचा अतिरिक्त खर्च विधिमंडळाच्या मान्यतेशिवाय केल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. ही बाब राज्य घटनेच्या अनुच्छेद 204 चे उलंघन करणार आहे. कारण विधान मंडळाच्या मान्यतेशिवाय एक रूपयाही खर्च केला जाऊ शकत नाही. या तत्वाचा भंग झाल्याने या प्रकणाचा गांभीर्याने विचार करायला हवा, असे कॅगने म्हटले आहे.
चार वर्षांत सव्वा लाख कोटींच्या कर्जाची परतफेड करा
येत्या चार वर्षांत राज्याला जवळपास सव्वा लाख कोटी रूपयांची परतफेड करायची आहे. तर पुढील सात वर्षांत 1 लाख 84 हजार 354 कोटी म्हणजेच 56.37 टक्के कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. परिणामी सरकार कर्जाच्या जाळ्यात अडकू शकते. ते टाळण्यासाठी विचारपूर्वक योजना आखावी, असे कॅगने म्हटले आहे.
तोटय़ातील महामंडळे तोटा
- विदर्भ विकास महामंडळ 7.67 कोटी
- महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ 45.23 कोटी
- महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ 368.38 कोटी
- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ 2879 कोटी
- महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ 2.77 कोटी
- राज्य वस्त्रोद्योग महामंडळ 809 कोटी
- महाराष्ट्र राज्य कित्त महामंडळ 625 कोटी
- कोकण किकास महामंडळ 6.22 कोटी
- मराठवाडा वीिकास महामंडळ 1.57 कोटी























































