
केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अॅण्ड असेसमेंट इंडिया या देशातील अग्रगण्य शिक्षण, प्रकाशक आणि आंतरराष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे शिक्षक आणि शाळांसाठी व्यावसायिक विकास (प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे.
केंब्रिज पीडीपी हा शिक्षण वातावरणासाठी व शिकवण्याची पद्धत मजबूत करणारा शिक्षकांसाठीचा एक ऑनलाइन शैक्षणिक कोर्स आहे. यामध्ये आठ धड्यांद्वारे 40 तास शिकण्याची सामग्री आहे. प्रत्येकात एक मुख्य शैक्षणिक संकल्पना समाविष्ट आहे. हा कार्यक्रम सतत व्यावसायिक विकाससंदर्भातील राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे. यातील आठ धड्यांमध्ये विद्यार्थ्यांची व्यस्तत: वर्तणूक व्यवस्थापन, मेटाकॉग्निशन, ऑक्टिव्ह लर्निंग, ब्लूमचे वर्गीकरण, एकाधिक बुद्धिमत्ता, हिंदुस्थानातील शैक्षणिक वर्गाच्या वातावरणात डिजिटल तंत्रज्ञानासह शिकण्यासाठी आणि शिकवण्याचे मूल्यांकन यांचा समावेश आहे.




























































