मोफत नेत्र तपासणी आणि चष्म्याचा नंबर काढून घ्या! मनोरमा नेत्रालयाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शिबीर

मनोरमा नेत्रालयाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 25 जून रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चष्म्याचा नंबरही मोफत काढून घेता येणार आहे. याशिवाय काचबिंदू, मधुमेह आणि रेटिनाच्या आजारावरील चाचण्यांसाठी 50 टक्के सवलतही मिळणार आहे. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित डॉ. रागिनी पारेख आणि त्यांच्या चमूमार्फत रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात येणार आहे.

डोळ्यांच्या शस्त्रक्रिया तसेच चष्म्यासाठी 25 टक्के सवलत देण्यात येणार आहे. गरजू नेत्ररुग्णांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी 8097236939 या मोबाईल क्रमांकावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजल्यापासून शिबीर सुरू होणार आहे. मनोरमा नेत्रालय, युनिट क्रमांक 302, 303, 304, तिसरा मजला,
मॅरेथॉन मोंटे प्लाझा, डी-विंग, मदन मोहन मालवीय रोड, मुलुंड पश्चिम येथे हे शिबीर भरणार आहे.