विधानसभा निवडणुकीसाठी 235 महिला उमेदवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election

विधानसभा निवडणूकीसाठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून 235 महिला उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत एकूण 3 हजार 237 उमेदवार असून यामध्ये 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. चिंचवड मतदारसंघात जनहित लोकशाही पक्षामार्फत नितीश दगडू लोखंडे हे तृतीयपंथी उमेदवार निवडणूक लढवित आहेत.