ट्रेडिंगसाठी फायदेशीर कँडलस्टिक पॅटर्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रवीण धोपट

स्टॉक किंवा मार्केटची प्राईस स्क्रीनवर तीन पद्धतीने दिसते. लाईन चार्ट, बार चार्ट आणि कँडलस्टिक पॅटर्न चार्ट. ट्रेडर आपापल्या पसंतीनुसार त्याची निवड करीत असतो, परंतु फायनान्शिअल मार्केटमध्ये कँडलस्टिक पॅटर्न्स चार्ट हा सर्वात पॉप्युलर असणारा चार्ट पॅटर्न आहे. मूळ जपानचा असलेला हा पॅटर्न आता जगभर वापरला जातो. मार्केटची मानसिकता बदलणारा आणि ट्रेडिंगसाठी मदत करणाऱया या चार्ट पॅटर्नचे महत्त्वाचे प्रकार जाणून घेऊया…

डोजी – डोजी पॅटर्न म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग प्राईस फार जवळची असणे. काही वेळा ती प्राईस एकच असते. या पॅटर्नमध्ये कँडलला बॉडी जवळ जवळ नसतेच. हा पॅटर्न तयार होणे याचा अर्थ इंडिसिडन किंवा कोणताही निर्णय न घेण्याचा क्षण. बऱयाच वेळा यानंतर ट्रेंड रिव्हर्सल होण्याची शक्यता असते.

हॅमर आणि हँगिंग मॅन – या दोन्ही पॅटर्नची रचना एकसारखी असते. या पॅटर्नची बॉडी लहान असते आणि लोअर विक लांब असते. हॅमर पॅटर्न डाऊनट्रेंडच्या नंतर तयार होतो आणि यानंतर बुलिश रिव्हर्सलची शक्यता असते तर हँगिंग मॅन अपट्रेंडनंतर येतो आणि हा बेअरिश रिव्हर्सलचे संकेत देत असतो.

एन्गल्फिंग पॅटर्न – एन्गल्फिंग पॅटर्नमध्ये लगतच्या दोन कँडल्स अशा प्रकारे तयार होतात की, दुसरी कँडल पहिलीच्या पोटात तयार होते. बुलिश एन्गल्फिंग पॅटर्न हा डाऊनट्रेंडनंतर तयार होतो आणि यानंतर प्राईस वर जाण्याची शक्यता असते. बेअरिश एन्गल्फिंग पॅटर्न अपट्रेंड असताना तयार होतो .

मार्ंनग आणि इव्हिनिंग स्टार – हा पॅटर्न लगतच्या तीन कँडल्सचा मिळून तयार होतो. मार्ंनग स्टार कँडलस्टिक पॅटर्न डाऊनट्रेंडच्या शेवटाला तयार होतो. सुरुवातीला लहान बेअरिश कँडल, त्यानंतर बेअरिश डोजी आणि नंतर बुलिश कँडल अशी याची रचना असते. यानंतर मार्केट अपसाईड रिव्हर्स होण्याची शक्यता असते. याउलट इव्हिनिंग स्टार कँडलस्टिक पॅटर्न अपट्रेंडच्या शेवटाला तयार होतो. यात सुरुवातीची लहान बुलिश कँडल, त्यानंतर बुलिश डोजी आणि शेवटची बेअरिश कँडल हा संकेत डाऊनसाईड रिव्हर्सलचा असतो.

शूटिंग स्टार आणि इन्व्हर्टेड हॅमर – हा पॅटर्न म्हणजे लहान बॉडी आणि वरच्या बाजूला मोठी विक असा असतो. शूटिंग स्टार अपट्रेंडनंतर तयार होतो. यानंतर बेअरिश रिव्हर्सलची शक्यता असते. टेक्निकल अनॅलिसिसच्या सोबत कँडलस्टिक्स
पॅटर्नचा वापर वापर झाला तर तो फायदेशीर ठरतो.

(लेखक दीपंकर फिनकॅप इन्व्हेस्टमेंट प्रा लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)