
आंबेगावात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अर्जुन दिगंबर जाधव (वय 52, रा. कात्रजगाव, मूळ- कुंभेफळ, ता. परांडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पठार परिसरात गायमूख चौकात एकजण पिशवी घेऊन पळत जाताना पोलिसांना दिसून आला. त्याचा संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे खाकी रंगाच्या कागदामध्ये दीड किलो गांजा आढळून आला. तो गांजा विक्रीसाठी आणला असल्याची कबुली त्याने दिली. भारती विद्यापीठ पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





























































