
पंजाब कॉँग्रेसमधील पक्षांतर्गत राजकारणामुळे मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्याने नाराज असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अमरिंदर सिंग हे बंडाच्या पवित्र्यात असल्याची चिन्ह आहेत. सिद्धू यांनी पंजाब कॉँग्रेस प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला असतानाच अमरिंदर सिंग यांनी थेट दिल्ली गाठली आणि त्यानंतर राजधानीत राजकीय चर्चा रंगू लागली.
घर रिकामे करायला आलो होतो
दिल्ली विमानतळावर पत्रकारांशी बोलताना अमरिंदर सिंग यांनी राजकीय भेटीची शक्यता फेटाळून लावली. मी येथे कपूरथला हाऊस (नवी दिल्लीतील पंजाब मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान) रिकामे करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.




























































