
उत्तर गोव्यातील कुचेली – म्हापसा येथे रविवारी पहाटे झालेल्या कार अपघातात बेळगावच्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
कर्नाटकातील स्विफ्ट कार रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास कुचेली येथे झाडाला धडकल्याने कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
म्हापशातील कार अपघातातील सर्व युवक बेळगावचे असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये नयर अनगोलकर (28), रोहन गदद (26) व सनी अणवेकर (31) यांचा समावेश आहे. तर विशाल कारेकर (27) हा जखमी असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरु आहेत.
























































