घरी परतण्यासाठी पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या कारचा अपघात; चारजण जखमी

1275

लॉकडाऊनमध्ये अडकून पडल्याने घरी जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेऊन पुण्याहून जालनामार्गे नागपूरला जाणाऱ्या सुझुकी आर्टिका कारचा समोरचा टायर बदनापूरजवळ पक्चंर झाला. त्यामुळे गाडीला झालेल्या अपघातात कारमधील चारजण जखमी झाले. अपघातात कार चारवेळा उलटली. मात्र, सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही.

नागपूर येथील विनोद मनोहरराव आरमारकर व राजेंद्रकुमार दिनेशचंद गोयल यांच्या मुली पुणे येथे शिक्षण घेत आहे. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने मुली पुण्यात अडकल्याने त्यांना घरी आणण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेऊन विनोद आरमारकर ,राजेंद्रकुमार गोयल, सानिध्या विनोद आरमारकर आणि सोनाक्षी राजेंद्रकुमार गोयल शुक्रवारी सकाळी पुण्याहून संभाजीनगर -जालना मार्गे नागपूरला कारने निघाले होते. कार दुपारी 4 वाजता बदनापूर शहरात आली असता काही अंतरावर जाताच कारचा समोरचा टायर फुटल्याने चालकांचे नियंत्रण सुटले आणि समोरून चाललेल्या दुचाकीला धडक देऊन चारवेळा उलटली आणि शेतात घुसली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमधील चौघे किरकोळ जखमी झाले. दुचाकीस्वार विष्णू अंभोरे व रमेश गायकवाड यांना किरकोळ मार लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या