स्मार्टफोन वाचवणार तुमचा जीव, गुगल आणतेय कार क्रॅश डिटेक्शन फीचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऍण्ड्रॉईड स्मार्टफोन युजर्ससाठी खूशखबर आहे. पिक्सेल फोनमधील काही फीचर्स लवकरच इतर ऍण्ड्रॉईड स्मार्टफोनसाठी गुगल कंपनी उपलब्ध करून देणार आहे. त्यापैकीच एक भन्नाट फीचर म्हणजे ‘कार क्रॅश डिटेक्शन’. या फीचरचे वैशिष्टय़ म्हणजे कारचा अपघात झाल्यावर आपोआप आपत्कालीन क्रमांकावर फोन लागेल. ज्यामुळे कारमधील प्रवाशांचा जीव वाचण्यास मदत होईल. या फीचरसाठी स्मार्टफोनमध्ये आवश्यक असणारी मोशन सेन्सर वापरणारी कार्यक्षमता लवकरच नॉन पिक्सेल ऍण्ड्रॉईड फोनपर्यंत पोहोचू शकते. गुगलचे हे फीचर सध्या गुगल पिक्सेल 3 आणि त्यानंतरच्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. मात्र बॅटरी सेव्हर किंवा एअरोप्लेन मोडवर फोनमध्ये ऑन असल्यास हे फीचर काम करणार नाही. लवकरच पिक्सेल फोनमधील ‘क्रायसिस अलर्ट’ आणि ‘सेफ्टी चेक फीचर’देखील ऍण्ड्रॉईड युजर्सला उपलब्ध होण्याची शक्यता आहे.