
सामना प्रतिनिधी । आष्टी
कडा शहरापासून जवळच नगर-बीड रस्त्यावर असलेल्या शेरी बुद्रुक येथे पुलावरून इंडिका कार कोसळुन झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जामखेड तालुक्यातील जवळा या गावाकडे जात असताना इंडिका कार आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे आल्यानंतर गाडी पुलावरून वीस फूट खाली कोसळली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून जखमींना गाडीमधून बाहेर काढून उपचारासाठी नगर येथे गावकऱ्यानी हलवले आहे.
























































