सार्थ मोरे, समृद्धी घाडीगावकर विजेते

373

सेंट जोसेफ हायस्कूलच्या सार्थ मोरेने डॉ. डासिल्व्हा हायस्कूल-दादरच्या मिहीर शेखचे आव्हान 25-5, 12-9 असे संपुष्टात आणून माहीम ज्युवेनाईल ट्रॉफी मोफत आंतरशालेय 14 वर्षांखालील कॅरम स्पर्धा जिंकली. माहीम ज्युवेनाईल स्पोर्टस् क्लब आणि आयडियल स्पोर्टस् अकॅडमीतर्फे शिवाजी पार्क येथे झालेल्या 17 वर्षांखालील कॅरम स्पर्धेत पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या समृद्धी घाडीगावकरने गुरुनानक हायस्कूल-उल्हासनगरच्या आदिल बेलेकरचा 10-5, 12-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिह्यातील शालेय 152 मुलामुलींच्या स्पर्धेत भारतीय कॅरम संघाचे यशस्वी माजी प्रशिक्षक व विख्यात कॅरमपटू सुहास कांबळी तसेच सुहास पोमेंडकर व प्रणेश पवार यांचे खेळाडूंना मार्गदर्शन देखील लाभले. स्पोर्टस् असोसिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन सहकार्याने सिस्का कॅरम बोर्डवरील स्पर्धेमध्ये उपांत्य उपविजेतेपदाचा पुरस्कार 14 वर्षांखालील गटात बेंगाल एज्युकेशन स्कूलच्या सेजल लोखंडे व डी.पी.वाय.ए.स्कूलच्या कौस्तुभ जागुष्टे यांनी तर 17 वर्षांखालील गटात चेंबूरनाका मनपा शाळेचा प्रथमेश धोत्रे व रोहन पाटील यांनी मिळविला. एकूण 32 खेळाडूंना पुरस्कार कॅरमप्रेमी विजय येवलेकर, सुहास कांबळी, मीनानाथ धानजी, महेश शेटये, सुनील पाटील, डॉ. जितेंद्र लिंबकर व संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या