जिंतूरमध्ये दुकान सुरू असल्याने कापड दुकानदारांसह सहा ग्राहकांवर गुन्हा

765

कोरोना रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच काही जिल्ह्यात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. जिवनावश्यक वस्तूशिवाय इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात गुरुवारी चारठाणा येथील एका कापड दुकानदार व्यापार करत असल्याचे पोलिसांना समजले. या प्रकरणी कापड व्यापाऱ्यांसह सहा ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत जमादार, बिट जमादार शेख याकुब, इरफान इनामदार, गरूड, बळीराम इघारे आदी कर्मचारी गावात व बाजार परिसरात पेट्रोलींग करीत असताना दुपारी 1 वाजता आठवडी बाजार परिसरातील प्रेरणा ड्रेसेस या कापड दुकानासमोर आले. त्यावेळी दुकानातील शटरमधून आवाज येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी कापड दुकानात प्रवेश केला. कापड दुकानदार रामकृष्ण पुरुषोत्तम भुते हे सहा ग्राहकांना आतमध्ये घेऊन व्यापार करीत असल्याचे पोलिसांना आढळले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जमादार इरफान इनामदार यांच्या तक्रारीवरून कापड दुकानदार रामकृष्ण पुरुषोत्तम भुते, साहेबराव रतन पवार, रामभाऊ सूर्यभान राठोड, नामदेव सुर्यभान राठोड, विजय रतन पवार, सुभाष मनीराम जाधव, हरीषचंद्र आढे या सात जणांवर चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बळवंत जमादार याच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार शेख याकुब करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या