
व्हाट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका ग्रुपवर बोईसर पोलीस ठाण्यात ग्रुप अॅडमिनसह 11 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी पोलिसांना ट्विटरवरून तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. एका व्हॉट्सॲप ग्रुपवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारा मेसेज टाकल्याने ग्रुपच्या 10 अॅडमीनसह मेसेज टाकणाऱ्या एकावर असे एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
बोईसर येथील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल व्हावा, एकोप्यात बाधा निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल या दृष्टिकोनातून एक पोस्ट टाकण्यात आली. या ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांना ट्विटरवरुन तक्रार आली होती. बोईसर पोलिसांनी त्या अनुषंगाने व्हाट्सअॅप ग्रुप ॲडमिन व पोस्ट टाकणाऱ्या आरोपीविरोधात माहिती घेत त्यांच्याविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेलकडून अधिक महिती घेऊन या 11 जणांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बोईसर पोलिसांनी दिली आहे.




























































