
सिडकोचा बडतर्फ प्रभारी सहाय्यक वसाहत अधिकारी सागर तापडिया याने पगाराच्या तुलनेत पावणेदोनशे टक्के बेहिशेबी मालमत्ता कमवल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तापडिया आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटने केलेल्या या कारवाईमुळे सिडकोच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सिडकोतील वादग्रस्त अधिकारी सागर तापडिया याच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तापडिया याच्या पगाराचे एकूण उत्पन्न १ कोटी
घराची झाडाझडती सुरू
तापडिया याचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या राहत्या घराची झाडाझडती सुरू केली आहे. तापडिया याने केलेल्या गैरव्यवहाराचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तापडियाच्या गैरव्यवहाराला त्याच्या पत्नीनेही सहकार्य केल्यामुळे तिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ लाख १७ हजार १४० रुपये इतके आहे तापडिया याने आपली पत्नी मनीषा हिच्या नावाव चक्क १ कोटी ४२ लाख १७ हजार १४० रुपयांच मालमत्ता घेतलेली आहे. एवढेच नाही तर त्याने १ कोटी ६४ लाख ४८ हजार ५२० रुपये खर्चह केले आहेत. सिडकोकडून मिळणारा पगार आणि तापडिया याने कमवलेली मालमत्ता याचा कुठेह ताळमेळ बसत नाही. त्याने १ कोटी ९४ लाख ४७ हजार ९०५ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जम केल्याचे निष्पन्न झाले आहे. पगाराच्या तुलनेत तापडिया याने मिळवलेली मालमत्ता ही १७३ टक्के जास्त आहे. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार वाघ यांनी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कर्मचारी धास्तावले
सिडकोच्या मलईदार विभागात काम करणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा रुबाब हा एखाद्या सम्राटासारखा आहे. अनेक अधिकाऱ्यांनी नवी मुंबईसह अलिबागमध्ये कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केली आहे. तापडियावर कारवाई करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पगार आणि मालमत्तेचा ताळमेळ तपासल्यामुळे सिडकोचे कर्मचारी धास्तावले आहेत.

























































