
बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विकास बालाजी पारसेवार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, हरंगुळ बु. ता.जि.लातूर येथील गट क्रमांक 111/1 मधील जमिनीच्या खरेदी व्यवहारापोटी 4 जानेवारी 2009 रोजी 12 लाख रुपये आणि 18 ऑगस्ट रोजी 13 लाख रुपये स्विकारल्याची रशीद पावती तयार करून त्यावर फिर्यादीची खोटी स्वाक्षरी करून 27 ऑगस्ट 2009 रोजीचा 100 रुपयांचा बॉन्ड पेपरवरही बनावट खरेदी व्यवहाराच्या ठरावाचा मजकूर नमूद करून त्यावरही खोट्या स्वाक्षरी करण्यात आलेल्या होत्या.
बनावट कागदपत्र तयार करून काझी शोएब अफरोज मोईनोद्दीन, रिझवान अब्दुल रज्जाक शेख, पंढरी अरुण कदम, संतोष प्रभाकर पवार, म.यासिन शरीफ, शोभा रामेश्वर सूर्यवंशी, महादू विठ्ठल गायकवाड, शेख इम्रान ईस्माईल यांनी फसवणूक केल्याची तक्रार दिल्यावरुन त्यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































