
दुचाकी वेडीवाकडी चालविल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना आंबेगाव बुद्रुकमधील एका महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी करन , व्यंकटेश अशोक सोलंकी यांच्यासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यता आला आहे. स्वप्निल अंकुश उभे (वय 20 रा. आंबेगाव ) बुद्रूक असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास स्वप्नील दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी करनने त्यांना दुचाकी आडवी मारली. त्यामुळे स्वप्निलने त्याला जाब विचारला असता, करणला राग आला. त्यामुळे त्याने इतर साथीदारांना बोलावून स्वप्निलवर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहेत.

































































