गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध जेजुरीत गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडावर आज पहाटे येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न करुन जमावबंदी उल्लंघन, शासकीय कामात अडथळा केल्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांवर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज पहाटे गोपीनाथ पडळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस प्रशासनाने त्यांना जवळ जाऊ दिले नाही. पडळकर व कार्यकर्त्यांची पोलीस व देवस्थानच्या कर्मचाऱयांशी झटापट झाली. यावेळी ढोल-ताशे वाजवीत, फटाके उडवून पुतळ्याचे अनावरण झाल्याची घोषणा पडळकर यांनी केली. तसेच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली. हा प्रकार समजताच जेजुरीत तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाहीर सभा घेऊन, तर काँग्रेसकडून पडळकर यांचा पुतळा जाळून निषेध नोंदविला.

ज्याचं डिपॉझिट जप्त झालं, त्याला महत्त्व कशाला?

आमदार गोपीचंद पडळकरांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली आहे. ज्याचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांची तुम्ही का एवढी दखल घेत आहात? उभं राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा आहे का? अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार पडळकर यांची पुण्यात खिल्ली उडवली.