सीबीआय चौकशीतील भ्रष्टाचाराच्या 7 हजार प्रकरणांचे खटले रखडले

सीबीआयकडून चौकशी सुरू असलेल्या तब्बल 7 हजार 72 भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे खटले विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत. त्यापैकी 379 प्रकरणांचे खटले तब्बल 20 वर्षांपासून रखडलेले आहेत, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालातून समोर आली आहे. भ्रष्टाचाराच्या एकूण खटल्यांपैकी 1 हजार 506 खटले जवळपास तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत, तर 791 खटले तीन वर्षांहून अधिक काळापासून रखडलेले आहेत.