
नाशिक जिल्ह्यातील शिदे पळसे गावाजवळ तपासणी पोलीस पथकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अविनाश गोविदराव आदिक यांचे वाहन तपासले असता त्यात 4 लाख 58 हजार रुपये सापडले.
पोलिसांच्या भरारी पथकाचे हरी सूर्यवंशी, संतोष पिंगळे व पोलीस कॉन्स्टेबल शामराव शिंदे व सखाराम शेळके यांनी केलेल्या तपासणीत आदिक यांच्या वाहनात 4 लाख 58 हजार सापडले. अविनाश गोविंदराव आदिक यांच्या कडील रोख रक्कम जप्त करून भरारी पथकाचे प्रमुख मच्छिन्द्र कांगणे यांनी सदरची रक्कम नाशिक कोषागार कार्यालयात जमा केल्या.



























































